Homeठाणे-मेट्रोमॉलमधील नामांकित बुटाच्या दुकानाला आग

मॉलमधील नामांकित बुटाच्या दुकानाला आग

ठाणे: घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरातील हायपर सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका नामांकित बूट कंपनीच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकानातील बुट आणि कपडे आदी वस्तू जळाले असून त्या दुकानाचे नुकसान झाले आहे. त्या दुकानाच्या बाजूला असलेला गाळा रिकामा असल्याने आग पसरली नाही. ही आग मंगळवारी सकाळी पावणे आठ ते आठ वाजण्याच्या सुमारास समोर आली. तसेच लागलेली आग एक तासात नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
हायपर सिटी मॉलमधून धूर हळूहळू येताना अचानक मोठया प्रमाणात धूर आकाशात पसरला होता. ही बाब लक्षात येताच मुकेश मिश्रा नामक व्यक्तीने तातडीने ती माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. तातडीने कासारवडवली पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी धाव घेत, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर त्या आगीवर तासाभरात नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून यावेळी, ०१-रेस्क्यू वाहनासह, ०२-फायर आणि ०२-हायराईस फायर अशी वाहने पाचारण करण्यात आली होती. आग लागलेला गाळा हा १५२५ स्क्वेअर फुटचा असून त्याच्या शेजारचा गाळा रिकामा असल्याने भीषण आगही आजूबाजूला पसरली नाही. मात्र ज्या गाळ्याला आग लागली त्याचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

error: Content is protected !!