दिवा:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना साबेगाव शाखेच्या वतीने शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साबेगाव शाखेच्या वतीने डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात मोफत डोळे तपासणी व माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले.याशिबिराला विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी शाखाध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी सांगितले की मागील काही दिवसापासून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या आरोग्य शिबिर घेत आहोत.
नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे असे ते यावेळी म्हणाले.