Homeठाणे-मेट्रोम्हातार्डी येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे दिमाखात भूमिपूजन; लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश

म्हातार्डी येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे दिमाखात भूमिपूजन; लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश

दिवा:ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २८ मधील म्हातार्डी रेल्वे कॅबिन ते म्हातार्डी चौक दरम्यानच्या रस्ता कामाचे भूमिपूजन रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले. राज्याचे नेते व उपमुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

शिवसेना दिवा शहरप्रमुख श्री. रमाकांत मढवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे म्हातार्डीवासीयांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न मार्गी लागला आहे.

या विकासकामाचे भूमिपूजन शहरप्रमुख व माजी उपमहापौर, नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक नगरसेविका श्रीमती दर्शना चरणदास म्हात्रे, नगरसेविका साक्षी मढवी आणि नगरसेवक दिपक नामदेव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला शिवसेना आणि अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यात प्रामुख्याने:
उपशहरप्रमुख, विभागप्रमुख व उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुख.महिला आघाडी, युवती सेना आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हातार्डी रेल्वे कॅबिन ते म्हातार्डी चौक हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार असून, विकासाच्या मुख्य प्रवाहात म्हातार्डी गावाला जोडण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री आणि खासदारांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी यावेळी प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

error: Content is protected !!