Homeठाणे-मेट्रोयुवकाचा तलावात बुडून मृत्यू ; पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला

युवकाचा तलावात बुडून मृत्यू ; पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला

ठाणे:- वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या साठेनगर येथील साहिल घोरपडे (१८) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सांयकाळी घडली. तसेच बुडालेल्या युवकाचा मृतदेह सोमवारी मध्यरात्री बाहेर काढण्यात आले. मृत साहिल हा त्या मित्रासोबत दुपारच्या सुमारास तलावात पोहण्यासाठी गेले होता. याचदरम्यान त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन , वागळे पोलीस, अग्निशमन दला तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दल या विभागांनी धाव घेतली. तातडीने अंडरवॉटर टेलिस्कोपिक कॅमेरा व थर्मल स्कॅनरच्या सहाय्याने बुडालेल्या साहिल याचा अंदाजे दीड तास शोधकार्य करून रात्रीचा अंधारामुळे तात्पुरत्या स्वरूपात शोधकार्य थांबविण्यात आले होते. पुन्हा सुमारे मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास शोधकार्य सुरू केल्यावर सुमारे दोन तासाच्या शोधकार्यानंतर साहिल या युवकाचा मृतदेह तलावामधून बाहेर काढण्यात आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

error: Content is protected !!