Homeठाणे-मेट्रो"येऊर के सन्मान मे ठाणे काँग्रेस मैदान मे" ची हाक देत ;...

“येऊर के सन्मान मे ठाणे काँग्रेस मैदान मे” ची हाक देत ; ठाणे काँग्रेस ने केली कारवाईची मागणी

ठाणे :- काही दिवसापूर्वी येऊर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजृून तिच्यावर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केला. त्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेचा सोमवारी काँग्रेसने येऊर च्या प्रवेशद्वारावर निषेध करत “येऊर के सन्मान में काँग्रेस मैदान मे ” या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौरा करण्यात आला. यावेळी येऊरमध्ये असलेली अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ,बंगले,लग्नाचे हॉल, लॉजिंग दाखवत यांच्यावर कारवाई करून जमीनदोस्त करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला व शांतता आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ,बंगले ,लग्नाचे लॉन असून येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्या,DJ चा मोठ्या प्रमाणात आवाज,रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ तसेच दारू विक्री सह मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश्य आवाजात धांगडधिंगा सुरू असतो त्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या हवाई दल स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र याना गंभीर धोका निर्माण झाला आहे असेही ते म्हणाले. तसेच बिबट्याच्या अधिवासाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो. वाहनांची रात्रभर ये जा तसेच अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई व गोंगाटाचा त्रास यामुळे निशाचर प्राणी, पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाहीत तसेच हाॅटेल, टर्फच्या आतील भाग दिसू नये म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षक भिंतीमुळे प्राण्याचे वहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत, महानगरपालिकेच्या मेहेरबानीने अनधिकृत हॉटेल व बंगले यांना चोवीस तास पाणीपुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणीटंचाईचा सामना करत लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे
याप्रसंगी चव्हाण यांच्यासोबत ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह उमेश कांबळे,महेंद्र म्हात्रे,रवींद्र कोळी,निशिकांत कोळी,संगीता कोटल, आशा सुतार,शिरीष घरत,आशिष गिरी,विनीत तिवारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!