Homeशहर परिसरयेत्या 10 ऑगस्टला जनतेच्या साक्षीने दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक...

येत्या 10 ऑगस्टला जनतेच्या साक्षीने दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करणार- प्रकाश पाटील

दिवा:-दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करावे अशी मागणी मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली असून येत्या 10 ऑगस्टला दिवावासीयांच्या साक्षीने या चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करणार असल्याची घोषणा मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.

दिवा शहरातील प्रमुख ठिकाण असणाऱ्या दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात यावे अशी मागणी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमी जनतेकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून चौकाच्या नामकरणास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मनसेचे प्रकाश पाटील यांनी बुधवारी दिवा चौक येथे भगवा झेंडा स्थापित करून येत्या 10 ऑगस्टला दिवा चौकाचे नामकरण दिवा वासीयांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली आहे. यावेळी दिवा शहरातील सर्व शिवप्रेमी जनतेने, तसेच सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे असे आवाहनही प्रकाश पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!