Homeठाणे-मेट्रोरमाकांत मढवी यांचा ठाकरे गटाला धक्का ; दोन प्रमुख विभागप्रमुखांचा शिंदेच्या शिवसेनेत...

रमाकांत मढवी यांचा ठाकरे गटाला धक्का ; दोन प्रमुख विभागप्रमुखांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश!

ठाणे/दिवा:येऊ घातलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, दिव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दिव्यातील ठाकरे गटाचे दोन प्रमुख शिलेदार आणि विभागप्रमुख गुरुनाथ नाईक व श्रीधर बेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
ठाणे महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. दिवा हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग मानला जातो.निवडणुकीच्या तोंडावरच दोन विद्यमान विभागप्रमुखांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे.
रमाकांत मढवींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश:
ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिंदे गटाचे जेष्ठ नेते रमाकांत मढवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गुरुनाथ नाईक आणि श्रीधर बेडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. यावेळी दिव्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!