Homeठाणे-मेट्रोरश्मी ठाकरे यांनी घेतले ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे दर्शन

रश्मी ठाकरे यांनी घेतले ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे दर्शन

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, स्थैर्य आणि आनंद लाभू दे

ठाणे : – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्याच्या टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले. यावेळी देवीची खणा-नारळाने ओटी भरून रश्मी ठाकरे यांनी अंबेमातेची महाआरती केली. राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, स्थैर्य आणि आनंद लाभू दे, असे साकडे त्यांनी देवीला घातले.

रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंभी नाक्यावर शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तुफान गर्दी केली होती. तसेच यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे च्या घोषणेने टेंभी नाका परिसर दणाणून गेला. अवघा टेंभी नाका भगवामय झालेला पाहायला मिळाला.

दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीचे दर्शन घेऊन महाआरती करतात. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीपासून शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच त्यांनी शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या निवासस्थान विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेतले. दरम्यान चंदनवाडी शिवसेना शाखा , श्रीरंग शिवसेना शाखा आणि रामचंद्र नगर नवरात्र उत्सवाला त्यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख नरेश मनेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रकाश पाटील ,प्रवीण म्हात्रे ,एम के मढवी, संजय तरे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे ,शहर प्रमुख अनिश गाढवे,शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, संपर्कप्रमुख रंजना नेवाळकर,जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, रंजना शिंत्रे,नीलम धवन, वैशाली दरेकर , उपजिल्हा संघटिका आकाश राणे ,महेश्वरी तरे ,ज्योती कोळी , ठाणे विधानसभा संघटिका प्रमिला भांगे, वैशाली शिंदे ,विद्या कदम, स्मिता इंदुलकर ,अनिता प्रभू ,कळवा मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पालता भानुषाली, कल्याण ग्रामीण विभाग संघटिका योगिता नाईक कळवा समन्वयक माजी नगरसेविका नीलिमा ताई शिंदे, स्नेहल सावंत ,ज्योती पाटील, माजी नगरसेवक नंदिनी विचारे , अंकिता पाटील यांच्यसह उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख, व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!