मुंबई :- राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणात हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
मराठवाड्यात पुढील चार दिवस काही जिल्ह्यात पावसाची हजेरी राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकण व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे.
IMD ने चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट दिलाय तर वर्धा नागपूर भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे, कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत.
ठाण्यासह पुण्यात सातारा, नगर सांगली, सोलापूर कोल्हापूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट असून मराठवाड्यात लातूर धाराशिव, बीडमध्ये पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत.
पुढील चार दिवस विदर्भ व कोकणात पावसाचे ऑरेंज अलर्ट आहेत तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आले आहेत. कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटात होऊ शकतो.