ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे व पालघर जिल्हा समन्वयकपदी आनंद परांजपे यांची नियुक्ती झाली असून बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते परांजपे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते व ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्षपदाची जबाबदारी परांजपे सांभाळत असतानाच त्यांच्या भरीव कामाची दखल घेऊन, पक्ष वाढीसाठी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आनंद परांजपे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे व पालघर जिल्ह्याच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपविली.