Homeशहर परिसरराष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ भाजपच्या वतीने दिव्यात तिरंगा पदयात्रा

राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ भाजपच्या वतीने दिव्यात तिरंगा पदयात्रा

दिवा:- भारतीय जनता पार्टी दिवा शहर यांच्या वतीने राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ शुक्रवारी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. दिवा शहरातील प्रशांत नगर, येथील भाजपचे ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळून या तिरंगा पद यात्रेला सुरूवात करण्यात आली.
राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवण्यासाठी व सीमेवरील सैनिकाचे मनोबल वाढवण्यासाठी सदर तिरंगा पदयात्रेचे दिवा भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सदर तिरंगा यात्रा मुंब्रादेवी कॉलनी रोड,विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मार्गाने काढण्यात आली. दिवा पोलीस चौकी येथे या पदयात्रेचा समारोप झाला.

भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन रमेश भोईर,
ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य अशोक पाटील ,गणेश भगत , विजय भोईर ,विनोद भगत, रोशन भगत , जिलाजीत तिवारी , माजी मंडळ अध्यक्ष दिलीप भोईर , ठाणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सतीश केळशीकर
दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण , अंकुश मढवी, प्रवीण पाटील, मधुकर पाटील ,महिला मोर्चा अध्यक्ष सपना भगत , सीमा भगत , उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग , अशोक गुप्ता , ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्रीधर पाटील, व्यापारी मोर्चा अध्यक्ष जयदीप भोईर , सुदेश पाटील , यज्ञेश पवार, रामदास सुगर, दुर्गेश मढवी, प्रणव भोईर ,आकाश भोईर , राहुल शाहू , विठ्ठल गावडे ,ज्येष्ठ नागरिक अमरनाथ गुप्ता , संजय सिंह , अवधराज राजभर ,समशेर यादव ,वीरेंद्र गुप्ता , अनिल सिंग , किरण कोरगावकर , रवी मुनंकर , क्रांतिसिंह, अमरसिंग , कल्पेश सारस्वत , मंगल राणे ,पुनम सिंग , रीना सिंग , नीलम मिश्रा , वर्षा काळे , साधना सिंग ,रेणू पांडा , मनीषा शालबिंद्रे, दिव्या शेलार रुक्मिणी जोंधळे ,जानवी मांडवलकर नम्रता गोसावी ,गायत्री शिंदे, रेणूबेन पढाया आदी कार्यकर्ते व पदाधिकारी,तसेच दिवेकर नागरिकांनी या तिरंगा पदयात्रेत आपला सहभाग नोंदवला.

error: Content is protected !!