Homeठाणे-मेट्रोरिक्षाचालक जखमी ; अपघाताने वाहतुकीवर परिणाम

रिक्षाचालक जखमी ; अपघाताने वाहतुकीवर परिणाम

ठाणे:- कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्या कंटेनरने पुढे असलेल्या रिक्षाला धडक दिली. या घटनेत रिक्षाचालक धीरजकुमार मेहता (४२) हा जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमार पातलीपाडा उड्डाणपुलावर घडली. यामुळे ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणारी वाहतूक सुमारे ४०-मिनिटे धिम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यावर वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
न्हावसेवा येथे कंटेनर घेऊन चालक शोहेब अत्तर हा घोडबंदर रोडमार्गे सुरत येथे निघाला होता. याचदरम्यान पातलीपाडा उड्डाणपुलावर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि पुढे असलेल्या रिक्षावर जाऊन धडकला. या घटनेत माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि कासारवडवली पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी रिक्षाचालक जखमी झाल्याचे समोर आले. या अपघाताने वाहतुकीवर परिणाम झाल्याने तातडीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले. याचदरम्यान ४०मिनिटे गेल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. तर रिक्षाचालकाच्या दोन्ही पायांना आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाला असून रिक्षाचेही नुकसान झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

error: Content is protected !!