Homeठाणे-मेट्रोरिक्षामधून चेंबर झाकण घेवून चोरटे पसार ; प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

रिक्षामधून चेंबर झाकण घेवून चोरटे पसार ; प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

गुन्हा दाखल करण्यास विलंब

ठाणे:- टिकुजिनी वाडी येथील कल्पतरू हिल्स फेज २ या इमारतीच्या गेटच्या समोरील चेंबरचे लोखंडी झाकण रिक्षामध्ये टाकून दोन जण पसार झाले आहेत. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तेथील रहिवाशांमुळे चोरीची घटना समोर आली.
११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे रिक्षाने त्या इमारतीच्या गेट वर आले आणि थांबले. त्यातील टी शर्ट घातल्याने एका चोरट्याने कोणी नाही ना याची पाहणी केली. कोणी दिसत नसल्याचे पाहून ते झाकण थोडे उचलून बाजूला केले. त्यानंतर रिक्षा चालकाचा पोशाख परिधान केला दुसरा चोरटा आला आणि दोघांनी ते झाकण उचलून रिक्षा ठेवून तेथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार त्या परिसरात लावलेल्या सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर झाकण चोरीला गेल्याचा प्रकार समोर आल्यावर त्यांनी ही बाब ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेला सीसीटीव्ही फुटेजद्वारे निर्दशनास आणून दिली. तसेच या प्रकारची योग्य ती पोलीस कारवाई करावी. अशी विनंती महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गास रहिवाशी विनोद जगदाळे यांनी केली. त्यानुसार याबाबत ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने संबंधित विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर ही दिवसभरात त्या विभागाने गुन्हा दाखल केला नाही. तसेच शुक्रवारी याची तक्रार पोलीस ठाण्यात जाऊन देण्यात येईल. माहिती सूत्रांनी दिली.

error: Content is protected !!