Homeठाणे-मेट्रोरिक्षा चोरटा गजाआड ; तीन रिक्षा जप्त

रिक्षा चोरटा गजाआड ; तीन रिक्षा जप्त

ठाणे:- ठाणे आणि उल्हासनगर या परिसरात रिक्षांची चोरी करणाऱ्या उदय विलास साठे (३२) याला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. त्याने नौपाडा, राबोडी आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची कबुली देत, त्या गुन्ह्यांमधील ०३ रिक्षा जप्त करण्यात यश आले आहे. ३१ मार्च रोजी ठाणे गुन्हे शाखेने तीन हात नाका येथून निघालेल्या उदय साठे याला संशयित म्हणून गोकुळ नगर येथे ताब्यात घेतले. त्याची चौकशी त्याने वरील गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या तीन रिक्षा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

error: Content is protected !!