Homeठाणे-मेट्रोलिफ्टचा रोप वे तुटून लिफ्ट थेट तळमजल्यावर ; तीन जण किरकोळ जखमी

लिफ्टचा रोप वे तुटून लिफ्ट थेट तळमजल्यावर ; तीन जण किरकोळ जखमी

मुंब्र्यातील घटना

ठाणे:- लिफ्टचा रोप वे तुटून लिफ्ट थेट सातव्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळल्याची घटना मुंब्र्यात बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जिक्रा महल या इमारतीमधील रहिवासी इम्रान शेख (३०) आयशा शेख (९) आणि इकरा शेख (५) असे तिघे जखमी झाले असून त्यांच्यासह त्यावेळी लिफ्टमध्ये आणखी तिघे जण होते. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
गुरुवारी सकाळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेत फोन वरून मुंब्रा, रशीद कंपाउंड या ठिकाणी असलेल्या तळ अधिक ७ मजली जिक्रा महल या इमारतीमध्ये लिफ्टचा रोपवे तुटला आणि ती लिफ्ट थेट खाली तळमजल्यावर कोसळली, त्यावेळी लिफ्टमध्ये सहा जण होते. अशी माहिती देण्यात आली. मात्र ती घटना गुरुवारी सकाळची नसून ती बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमाराची होती. तर या घटनेतील जखमींना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यामध्ये इम्रान यांच्या कमरेला दुखापत झाली आहे. तर आयशा हिला मुका मार तर इकरा ही किरकोळ जखमी झाली आहे. त्या तिघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. असे ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!