Homeठाणे-मेट्रोलॉन्ड्रीला लागलेल्या आगीने उडवली २५० रहिवाश्यांची झोप ; वागळे इस्टेट मधील पहाटेची...

लॉन्ड्रीला लागलेल्या आगीने उडवली २५० रहिवाश्यांची झोप ; वागळे इस्टेट मधील पहाटेची घटना

ठाणे: वागळे इस्टेट, श्रीनगर परिसरात गंगा विहार इमारतीमधील नित्यानंद लाँड्रीमध्ये रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीच्या घटनेने इमारतीमध्ये मोठया प्रमाणात धूर पसरल्याने त्या इमारतीमधील तब्बल ४८ कुटुंबातील अंदाजे २५० रहिवाश्यांची झोप मोड झाली.याशिवाय त्या सर्वांना सुरक्षेच्या दृष्टीने सुखरूप बाहेर आल्यानंतर रस्त्यावर येऊन उभे राहण्याची वेळ ओढवल्याचे पाहण्यास मिळाले. लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणली. तर,या आगीच्या घटनेत लॉन्ड्री मधील इस्त्री, लाकडी कपाट, कपडे, विद्युत वायरिंग इतर साहित्य अक्षरशः जळून खाक झाले आहे. दरम्यान लाँड्रीमधील ०३ व्यावसायिक सिलिंडर वेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतल्याने मोठे अनर्थ टळले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असल्याची सूत्रांनी दिली.
हे वर्ष सुरू झाल्यापासून ठाणे शहरात लहान मोठ्या आगीच्या घटनांची मालिका सुरू झाली आहे. त्यातच रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, श्रीनगर येथील नित्यानंद लाँड्रीला आग लागली असून मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. अशी माहिती ठाणे महापालिका वागळे अग्निशमन केंद्रात कळविण्यात आली. तातडीने अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन,श्रीनगर पोलीस आणि महावितरण या विभागांनी धाव घेतली. इमारत ही तळ अधिक ४ मजली असून प्रत्येक मजल्या १२ कुटुंब वास्तव्यास आहेत. तसेच तळ मजल्यावर ३५०० स्क्वेअर फुटांचा लाँड्रीचा गाळा आहे. त्या गाळ्यातील कपडे, लाकडी कपाट, वायरिंग झाल्याने मोठया प्रमाणात धूर हा इमारतीमध्ये पसरल्याने इमारतीमधील त्या ४८ कुटुंबातील अंदाजे २५० लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. याचदरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर ही नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तेंव्हा कुठे आग सकाळ सहा वाजेपर्यंत पूर्णपणे नियंत्रणात आली. मात्र या घटनेत कोणतीही जिवीतहानी किंवा कोणालाही दुखापत झलेली नाही. आगीच्या घटनेत लाँड्रीचा गाळ्यामधील कपडे, कपाट, वायरिंग, इस्त्री व इतर साहित्य जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे. तसेच गाळ्यामध्ये असलेले ३ व्यावसायिक सिलिंडर सुरक्षेतेच्या कारणास्तव अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यामध्ये घेतले आहेत. तर यावेळी ०२ फायर वाहन,०१ जम्बो वॉटर टँकरसह ०१- रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले होते. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!