Homeठाणे-मेट्रोलोकनेते शैलेश पाटील यांच्या वतीने महिला दिनानिमित्त 20 महिलांना मिळणार लकी ड्रॉच्या...

लोकनेते शैलेश पाटील यांच्या वतीने महिला दिनानिमित्त 20 महिलांना मिळणार लकी ड्रॉच्या माध्यमातून मोफत रिक्षा

दिवा:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिवा शहरातील महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने शिवसेना उपशहर प्रमुख लोकनेते शैलेश पाटील यांच्या वतीने 20 रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे.

दिवा शहरातील महिलांना स्वयंरोजगारासाठी रिक्षा वाटप करण्याचा उपक्रम लोकनेते शैलेश पाटील यांनी आयोजित केला असून या उपक्रमांतर्गत शहरातील 20 महिलांना वीस रिक्षांचे वाटप केले जाणार आहे. ही सुविधा दिव्यातील महिलांसाठी असून ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार पेक्षा जास्त नाही अशा महिला सदर उपक्रमासाठी अर्ज करू शकतात असे शैलेश पाटील यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 9 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून 10 मार्च रोजी याबाबतचा लकी ड्रॉ काढला जाणार असल्याचे शैलेश पाटील यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!