ठाणे सिव्हिल रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
ठाणे :- “देश नेमका बनतो कशाने? जमिनीने की दगडधोंड्याने? तर देश बनतो त्यातील लोकांनी. आणि या लोकांना एकत्र आणून एकोप्याने ठेवणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आणि याच लोकशाहीच्या अवलंबामुळेच देशाला खरे अस्तित्व प्राप्त होते. हाच मूलभूत विचार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टीने रुजवला,” असल्याचे प्रतिपादन लोकनेते राज असरोंडकर यांनी केलं.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तीन थोर विभूतींच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपणारा हा कार्यक्रम अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते आणि विचारवंत राज असरोंडकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांमध्ये नवचेतना निर्माण केली. त्यांनी शिवाजी महाराजांचा प्रशासनातील न्यायप्रिय दृष्टिकोन, महात्मा फुले यांची सामाजिक समता आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना या तिन्ही दिग्गजांच्या कार्याचा परस्पर संबंध स्पष्ट करत समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी आपले अनुभव सांगुन कार्यक्रमाचे स्तर उंचावले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ मृणाली राहूड, नेत्रशल्यचिकित्सक डॉ संगीता माकोडे, शल्यचिकित्सक वर्ग डॉ निशिकांत रोकडे, भुलतज्ञ् डॉ प्रियांका महांगडे, अधिसेविका श्रीम प्रतिभा बर्डे, सहा. अधिसेविका घाणे, प्राध्यापीका श्रद्धा मेस्त्री यांनी आपले मार्गदर्शन करून सर्वांना प्रोत्साहित केले. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ विलास साळवे ह्यांनी आपल्या वाद्यवृंद सहित कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होत.






