ठाणे, दि. 21– वर्तकनगर येथील एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी पुराणिक बिल्डर्सच्या कार्यालयासमोर मूक आंदोलन करून पुराणिक बिल्डर्सचा जाहीर निषेध केला.
पुराणिक बिल्डर्सने 40 सभासदांची 9 कोटी थकबाकी दिलेली नाही, घरांचा ताबा देऊनही गेले 27 महिने घरांची नोंदणी केलेली नाही, नोंदणीकृत कराराप्रमाणे कोणत्याही कामाची पूर्तता केलेली नाही, अशा मजकूराचा बॅनर या सभासदांनी फडकवून पुराणिक बिल्डर्सचा जाहीर निषेध केला.
ठाणे येथील कोर्टात एकता को-ऑपरेटिव्ह सहकारी संस्थेतर्फे पुराणिक बिल्डर्स विरोधात केस चालू आहे. त्याची तारीख आज मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी होती, त्यावेळी सर्व सभासद कोर्टात हजर राहिले होते व त्यानंतर वर्तकनगर येथील पुराणिक बिल्डर्सच्या ऑफिसकडे जमा होऊन कोणतीही घोषणा न देता फक्त बॅनर फडकवून निषेध आंदोलन करण्यात आले.