ठाणे:- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय, ठाणे “या महामंडळाकडून रु.10 लाख कर्ज मिळवून देतो” म्हणून जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील लोकांकडून काही रोख रक्कमेची मागणी केली जात आहे व तद्नंतर आठ दिवसामध्ये तुम्हाला रु.10 लाखांचे कर्ज मिळणार व त्यामधील दोन ते तीन लाख रुपये वरिष्ठ अधिकारी यांना द्यावे लागतील व या कर्जाची तुम्हाला परतफेड करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये काही तोतया व्यक्तींनी लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करीत असल्याच्या तोंडी तक्रारी या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत.
जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील लोकांनी अशा अफवांना बळी पडू नये, अशी कोणतीही योजना या महामंडळाकडून राबवली जात नाही, व या महामंडळामार्फत कोणत्याही एजंट / मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय-ठाणे या महामंडळाकडून करण्यात आले आहे.
अफवांना बळी पडून आपण कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक देवाण घेवाण करु नये, अन्यथा सदरहू नुकसानीस महामंडळ जबाबदार राहणार नाही.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय, ठाणे या महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेची योग्य माहिती मिळविण्याकरीता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 2 रा मजला, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेच्या बाजुला, खारेगाव, कळवा, ठाणे- 400605. दूरध्वनी क्र.: 022-25420724 येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) जि.ठाणे जिल्हा व्यवस्थापक संदीप शिवराम चव्हाण यांनी केले आहे.