Homeठाणे-मेट्रोवागळे इस्टेट पोलिसांची अनोखी स्वच्छता मोहीम !

वागळे इस्टेट पोलिसांची अनोखी स्वच्छता मोहीम !

आठवड्यातून एक दिवस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पोलिस ठाणे परिसरात करू लागले साफसफाई

ठाणे : सामाजिक सलोखा राखण्याची मोठी जबाबदारी पोलीस सांभाळत असताना, वागळे पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी हाती झाडू घेतला आहेत. तसेच आठवड्यातून एक दिवस आपल्या शिवारात स्वच्छता अभियान राबवत आहेत. जमा झालेला केरकचरा, पालापाचोळा उचलून परिसर स्वच्छ दिसण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शनिवार किंवा रविवारी श्रमदान करत अभियान राबवताना दिसत आहेत.
आशियातील सर्वात मोठी लघु औद्योगिक वसाहत म्हणून वागळे इस्टेट परिसर ओळखला जातो. आता काळानुरूप येथील कारखाने बंद पडून याठिकाणी कार्यालय, गृहसंकुल उभी राहिलेली बघायला मिळतात. मात्र या सर्वात वागळे इस्टेट पोलीस ठाणे आज ही जैसे थे आहे. कोणताही गुन्हा घडल्यास या गुन्ह्याची उकल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पोलीस करत असून, आता पोलीस ठाण्यातील आवारात हातामध्ये झाडू घेऊन पोलीस स्वच्छता करताना देखील दिसून येत आहेत.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचा परिसर मोठ मोठ्या झाडांनी बहरलेला असून, झाडांचा पालापाचोळा ठिकठिकाणी पडलेला असतो. त्यामुळे पोलीस ठाण्यात येताक्षणी परिसर अस्वच्छ दिसायचा. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जमा होणारी पाने, काटक्या, धूळ, कागद, प्लॅस्टिक आदी कचरा उचलून पोलीस ठाण्याच्या शिवारात प्रसन्न वातावरण राहील या दृष्टीने प्रयत्न करतात.

” गेल्या काही दिवसांपासून आठवड्याचा एखादा शनिवार अथवा रविवार स्वच्छता अभियान ठाण्याच्या आवारात राबवत आहेत. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने पोलीस ठाण्याचा परिसर मोकळा आणि स्वच्छ टापटीप दिसेल या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे याचीच अंमलबजावणी करत आहोत. आमचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ही स्वच्छता करण्यासाठी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन केर कचरा काढतात. “- शिवाजी गवारे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट पोलीस ठाणे.

error: Content is protected !!