Homeठाणे-मेट्रोवायफळ बडबड करणाऱ्या "टायर काकूंचा" निषेध ; ठाण्यातील रणरागिणी संतप्त

वायफळ बडबड करणाऱ्या “टायर काकूंचा” निषेध ; ठाण्यातील रणरागिणी संतप्त

ठाणे :- वायफळ बडबड करणाऱ्या मिंधे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे पडसाद उमटताना सोमवारी ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या पोस्टरला टायरने चिरडून “बदक नीलम गोऱ्हे हाय हाय,” “टायर काकूंचा निषेध असो” “माफी माग माफी माग, नाक घासून माफी माग” अशा जोरदार घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब पक्षाच्या) महिला आघाडीने केल्या.
ठाण्यातील चिंतामणी चौकात महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आकांक्षा राणे, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राउत, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, विद्या कदम, अनिता प्रभू, नीलिमा शिंदे, राजेश्री नवीन सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, वनिता कोळी, पुष्पलता भानुशाली, अनुया पांजरी, रेखा पाटील, आरती मोरे, पौर्णिमा लाड, अपर्णा भोईर, अहिरे, वैशाली मोरे, शिला पाटील, सुरेखा खानेकर, रक्षिता सुभेदार, कविता धुमाळ,अमृता पवार, नैना सुर्वे, कांता पाटील, छाया आराममृगम, कविता सिनलकर, माहिमकर तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!