Homeठाणे-मेट्रोविजय भोईर यांच्यामार्फत दिवा स्टेशन ते सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्याबाबत सह्यांची...

विजय भोईर यांच्यामार्फत दिवा स्टेशन ते सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्याबाबत सह्यांची मोहीम, प्रवाशांचा प्रतिसाद

दिवा:-विजय भोईर यांच्या संघर्ष कोकण रेल्वे संघटनेमार्फत दिवा स्टेशन ते सीएसएमटी लोकल सुरू करण्याबाबत प्रवाशांची सह्यांची मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत दिवा शहरातील हजारो रेल्वे प्रवाशांनी सह्या करत सहभाग घेतला.

दिवा स्टेशन ते सीएसएमटी लोकल सेवा सुरू व्हावी अशी मागणी येथील रेल्वे प्रवासी अनेक दिवसांपासून करत आहेत.विजय भोईर यांच्या संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत रेल्वे प्रवाशांची सह्यांची मोहीम घेत शासनाचे लक्ष वेधले.दिवा स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल चालू करण्यासंदर्भात दिव्यातील हजारो रेल्वे प्रवाशांनी या स्वाक्षरी मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!