दिवा:- विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाच्या अंतर्गत भाजपचे ठाणे जिल्हा चिटणीस विजय भोईर यांनी विविध लोकहिताचे उपक्रम दिवा येथे आयोजित केले होते. यावेळी विविध योजनांचा लाभ स्थानिक नागरिकांनी घेतला.
भारत सरकार आणि ठा.म.पा. च्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत संकल्प यात्रा या योजनेची सांगता होत असताना दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी रोड परिसरात विकसित भारत संकल्प यात्रा या योजनेअंतर्गत आधार कार्ड अपडेशन, स्वानिधी योजना, फ्री हेल्थ चेक अप, पीएम आवास योजना, आयुष्यमान भारत कार्ड आधी योजना बाबत उपक्रम राबविण्यातआला. या उपक्रमाला दिवेकरांनी उत्सुर्तपणे प्रतिसाद दिला.ठामपाचे समन्वय अधिकारी आधार कुलकर्णी आणि डेव्हलपमेंट अधिकारी समीर शहा,भारतीय जनता पार्टी ठाणे शहरचे चिटणीस विजय अनंत भोईर यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत संकल्प यात्रेचे शिबिर दिव्यात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, विनोद भगत, रोशन भगत, समीर चव्हाण, गणेश भगत,सतीश केळशीकर, युवराज यादव, नरेश पवार, सौ. सपना भगत, प्रफुल्ल साळवी, जयदीप भोईर, अंकुश मढवी, अशोक सोलंकी, अवधराज राजभर, समशेर यादव, अनुराज पाटील, प्रकाश पाटील, सौ. संगीता विजय भोईर सौ. नीलम मिश्रा, या मान्यवरांनी उपस्थित दर्शवली.