Homeठाणे-मेट्रोवृक्षवल्ली प्रदर्शनाला ठाणेकरांचा प्रतिसाद ; दिड लाखाहून अधिक नागरीकांची भेट

वृक्षवल्ली प्रदर्शनाला ठाणेकरांचा प्रतिसाद ; दिड लाखाहून अधिक नागरीकांची भेट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केलेल्या वृक्षवल्ली २०२४ या १३ व्या वृक्ष प्रदर्शनाला तब्बल दिड लाखाहून अधिक ठाणेकर नागरीकांनी भेट दिली. या प्रदर्शनात विविध रंगाची फुले, झाडे, वृक्ष, शोभीवंत वृक्ष, औषधी झाडे, भाजीपाला आदींसह जांभळ्या रंगाच्या गुलाबाने आणि ट्युलिप या फुले जास्तच भाव खाऊन गेले आहेत. तसेच अनेकांनी विविध रंगाची फुल झाडे, शोभिवंत वृक्षांची खरेदी करत या प्रदर्शनाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
ठाणे महानगरपालिकेमार्फत वृक्षवल्ली २०२४ या १३ वे भव्य झाडे, फुले, फळ, भाजीपाला यांचे प्रदर्शनाचे ठाण्यातील रेमंड रेस ट्रैक, जे.के ग्राम, पोखरण रोड नं.१ येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात पहिल्या दिवसापासून याठिकाणी नागरीकांची गर्दी झाल्याचे पाहण्यास मिळाले. विशेष करून काही शाळांनी देखील या प्रदर्शनाला आवर्जुन भेट दिल्याचे दिसून आले. त्यातही, या प्रदर्शनात फुलांची, शोभिवंत वृक्षांची तसेच इतर वृक्षांची एवढा आर्कषक पध्दतीने मांडणी केली होती. त्यातूनही अनेकांनी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या प्रदर्शनामध्ये कुंड्यामधील शोभिवंत पानाची झाडे (झुडपे), कुंडयातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी (आॅर्कीडस) कुंडीतील वृक्ष, हंगामी फूल, दांडीसह (केट फ्लॉवर) इतर असे एकूण २२ विभाग व पोटविभाग आहेत त्यांची मांडणी याठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्याचबरोबर शहरातील उद्याने व वागांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये ज्यामध्ये लहान मोठ्या अशा एकूण २५० स्पर्धकांनी भाग घतला आहे. तसेच प्रदर्शनामध्ये बागांची सर्वोच्च वस्तु, उत्पादन, बांबूपासून तयार करण्यात आलेली शोभिवंत वस्तु इत्यादीचे जवळ जवळ ४० पेक्षा जास्त स्टॉल्स उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा प्रत्येक स्टॉलला अगदी खिळून होत्या. हे फुल झाड घ्यावे की ते अशी काहींची पंचाईत झाली होती. त्यातही लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा गुलाब तर दिसत होतेच, शिवाय जांभळ्या गुलाबाने यात अधिकचा भाव खावून गेला. तर जुन्या हिंदी चित्रपटात दिसणार ट्युलिपची फुलांनी देखील या प्रदर्शनात आपली वेगळी छाप सोडल्याचे दिसून आले.

error: Content is protected !!