Homeबिनधास्त बोलशिंदेच्या बंडा विरोधात ठाणे जिल्ह्यात पहिला आवाज आणि पहिली निदर्शने नवी मुंबईत,जनता...

शिंदेच्या बंडा विरोधात ठाणे जिल्ह्यात पहिला आवाज आणि पहिली निदर्शने नवी मुंबईत,जनता ठाकरेंसोबत

शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांचे वक्तव्य

भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे खरे शिवसैनिक कसे असू शकतात असा सवालही मोरे यांनी केला आहे.जे सत्तेच्या लालसेपोटी गेले आहेत त्यांना येणाऱ्या काळात पश्चाताप होईल.

नवी मुंबई:-मुख्यमंत्री होण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नादाला लागून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा घात केला असा घणाघात शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे.नवी मुंबईतील नाहटा आणि चौगुले गेले आहेत ते स्वार्थासाठी शिंदे गटात गेले आहे,सामान्य शिवसैनिक आणि जनता उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत असा विश्वास विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री मंत्री असताना त्यांना त्यांच्याच विश्वासू व्यक्तीने भाजपचा फायदा व्हावा म्हणून खाली खेचणे याला बाळासाहेबांचे निष्ठावंत कसे म्हणायचे असा सवाल जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे.शिंदे जर कट्टर शिवसैनिक आहेत तर स्वतः फोन करून लोकांना का बोलावत आहेत?जिल्हाप्रमुख यांच्यासाठी शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीत जाऊ नका असा शिंदेचा फोन आला होता,त्यावर आपण शिवसेना,बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी करणार नाही,मी बैठकीला जाणार असे ठणकावून सांगितले असा गौप्यस्फोट विठ्ठल मोरे यांनी केला.शिंदेच्या बंडा विरोधात ठाणे जिल्ह्यात पहिला आवाज आणि पहिली निदर्शने नवी मुंबईतील निष्ठावंत शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे केली असेही मोरे यांनी सांगितले. नवी मुंबईतील जे माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत त्यातील अनेकजण बाहेरून पक्षात आलेले होते,संघटनेतील मूळ पदाधिकारी शिंदे गटात जाणार नाहीत, संघटना आजही मजबूत आहे असे विठ्ठल मोरे म्हणाले.विजय नाहता हे संधीसाधू असून त्यांना उद्धव ठाकरे यांनी दोन दोन महामंडळ दिली.आता ती महामंडळ जाऊ नयेत म्हणून ही स्वार्थी लोक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यांच्या जाण्याने सेनेला फरक पडणार नाही, उलट सामान्य जनतेला यांचे गलिच्छ राजकारण आवडलेले नाही असे विठ्ठल मोरे म्हणाले.भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे खरे शिवसैनिक कसे असू शकतात असा सवालही मोरे यांनी केला आहे.जे सत्तेच्या लालसेपोटी गेले आहेत त्यांना येणाऱ्या काळात पश्चाताप होईल असे मोरे यावेळी म्हणाले.

भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे खरे शिवसैनिक कसे असू शकतात?

-विठ्ठल मोरे
error: Content is protected !!