दिवा:-शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या माध्यमातून दिव्यात मोफत वहया वाटप करण्यात आले.27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असतो. मात्र त्याआधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प माजी आमदार सुभाष भोईर यांनी सुरू केला आहे.मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम रविवारी 30 जून रोजी सुमित हॉल, मेट्रो हॉस्पिटल जवळ, दिवा आगासन रोड, दिवा ( पु ) येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिवा शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.