Homeशहर परिसरशिवसेना ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

शिवसेना ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

दिवा: ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या कार्यालयात विशेष सन्मान केला. यावेळी त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन आदराने गौरव केला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
यावेळी ज्योती पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमात रुक्मिणी विठ्ठल कदम, सहदेव बाबू कदम, प्रभाकर चौगुले, सुरेखा निवृत्ती जाधव, माजी सैनिक ज्ञानेश्वर शिंदे, शिवाजी महाडिक, आजी सुभद्रा शिंदे आणि पाटणकर काकी यांसह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांच्या योगदानाला आणि अनुभवाला आदराने वंदन करत, ज्योती पाटील यांनी हा सन्मान सोहळा यशस्वी केला.

error: Content is protected !!