Homeशहर परिसरशिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिधावाटप कार्यालय आपल्या दारी उपक्रम दिव्यात सुरू

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिधावाटप कार्यालय आपल्या दारी उपक्रम दिव्यात सुरू

दिवा:- दिव्यातील नागरिकांसाठी शिधावाटप कार्यालय आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्फत करण्यात आले होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना व शिवसैनिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराचा लाभ दिवा शहरातील गरजू नागरिकांनी घेतला. शिधावाटप कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम दिवा येथील सुमित हॉल मेट्रो हॉस्पिटल जवळ 7 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.

error: Content is protected !!