दिवा:-दिव्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा उपशहरप्रमुख सचिन राम पाटील यांनी आयोजित केलेल्या छट पूजेला भाविकांनी गर्दी केली होती.
स्वर्गीय जयराम मांगळ्या पाटील गणेश विसर्जन घाट येथे सदर छटपूजा आयोजित करण्यात आली होती . यावेळी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय महिला भगिनी आणि बांधवांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, माजी नगरसेविका सौ अंकिता विजय पाटील, चेतन पाटील, विजय पाटील, युवा सेनेचे अभिषेक ठाकूर, उपशहर संघटक सौ. प्रियांका सावंत,मच्छीन्द्र लाड, सौ. स्मिता जाधव, प्रतीक म्हात्रे, ओकेश भगत, महेश शितकर, मोहित गुप्ता, आकाश शुक्ला, संतोष कदम, नितेश पाटील, तुषार सावंत, अनिल साळवे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






