दिवा:– शिवसेना उपशहर प्रमुख व लोकप्रिय माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, १७ ऑगस्ट रोजी दिवा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जातात.२० ऑगस्ट रोजी शैलेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो.
सामाजिक भावनेतून शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे आयोजन श्री. कैलास मनोहर पाटील यांच्या वतीने करण्यात आले.
हे रक्तदान शिबिर रिलायन्स टॉवर शिवसेना शाखा दिवा येथे आयोजित करण्यात आले . ‘थेंब थेंब रक्ताचा, उपक्रम समाजसेवेचा’ या घोषवाक्यसह आयोजित या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेतला.
सदर शिबिरासाठी ब्लड लाईन आणि चॅरिटेबल ब्लड बँक, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या व्यतिरिक्त, हरदेव हॉस्पिटल दिवा चे संचालक श्री. शेखर हेमंत देशमुख हे देखील उपस्थित होते.
यावेळी प्रदीप पाटील,किरण जाधव, सुरेश जगताप, जगदीश कदम,माऊली मोहिते, संतोष तांबे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.