ठाणे :- कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिवा येथील रिलायन्स टॉवर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात भाग घेऊन स्वतः रक्तदान केले. दिव्यातील लोकप्रिय माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील यांनी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले.
त्याचाच एक भाग म्हणून, दिवा येथील रिलायन्स टॉवर परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला आमदार राजेश मोरे यांनी भेट दिली आणि स्वतः रक्तदान करून या उपक्रमाला पाठिंबा दिला.
याप्रसंगी आमदार राजेश मोरे यांच्यासोबत माजी नगरसेवक शैलेश पाटील आणि दिवा शहरातील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.