Homeशहर परिसरसंचित शैलेश पाटील याचे दहावी बोर्ड परीक्षेत 88 टक्के मार्क मिळवून घवघवीत...

संचित शैलेश पाटील याचे दहावी बोर्ड परीक्षेत 88 टक्के मार्क मिळवून घवघवीत यश

दिवा:-दिव्यातील शिवसेनेचे लोकप्रिय माजी नगरसेवक व उपशहरप्रमुख शैलेश पाटील यांचे चिरंजीव संचित पाटील याने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत 88 टक्के मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.

संचितने मिळवलेल्या दहावी बोर्ड परीक्षेतील यशाबाबत दिवा गावातील ग्रामस्थातून व त्यांच्या मित्र परिवारातून त्याचे कौतुक होत आहे. संचित शैलेश पाटील हा सुरुवातीपासूनच अभ्यासात पुढे असल्याचे त्याच्या जवळचे नातेवाईक सांगतात. योग्य नियोजन,मेहनत व अभ्यासात सातत्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याच्या जोरावर संचितने शालेय बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याचे त्याचे पालक सांगतात. संचितला मिळालेल्या यशाबद्दल त्याच्या मित्र परिवारातून व नातेवाईकातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!