Homeठाणे-मेट्रोसराईत सोनसाखळी चोरांची चौकडी जेरबंद;कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी

सराईत सोनसाखळी चोरांची चौकडी जेरबंद;कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी

सोनसाखळी,मोबाईल आणि वाहन चोरीचे ७० गुन्हे उघडकीस,एकूण ५० लाख १८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश

ठाणे: ठाणे शहरासह भिंवडी, बदलापुर, अंबरनाथ तसेच कल्याण, शिळ डायघर या परिसरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र आणि पुरूषांच्या गळ्यातील चैन खेचुन धूम ठोकणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आहे. तसेच त्या टोळीतील चौघांच्या मुसक्या कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्याकडून सोनसाखळी, मोबाईल आणि वाहन चोरी असे एकूण ७० गुन्हे उघडकीस आणण्यातही पोलिसांना यश आले. तसेच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील ५१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन तसेच ०६ मोटार सायकली, एक मारूती कार असा एकुण ५० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती ठाण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ठाणे पोलिसांनी दिली.
ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयीत इसम हे कल्याण परिसरात आंबिवली येथे येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३ पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कल्याण पोलिसांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमधून मूळ कर्नाटक येथील सध्या आंबिवली इंदिरानगर येथे राहणाऱ्या तौफीक तेजीब हुसेन (२९) तसेच कर्नाटक येथील मोहम्मद अली उर्फ कालीचरण झेवेरी अली ( ३६ ) तर आंबिवली पाटील नगर येथील अब्बास सल्लु जाफरी (२७) आणि सुरज उर्फ छोटया मनोज सांळूखे (१९ ) या सराईत चौकडीला मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. याचदरम्यान चौकशीत त्यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सोनसाखळी चोरीचे ४० गुन्हे, मोबाईल चोरीचे २४ गुन्हे, वाहन चोरीचे ०६ गुन्हे असे एकुण ७० गुन्हे केल्याची कबुली देत, त्यांच्याकडून त्या गुन्ह्यामधील ५० लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मोबाईल चोरी व वाहन चोरीचे गुन्हे कोणकोणते ठिकाणी केले आहेत याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणे शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे , पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त, (शोध १) शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकअजित शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस अमलंदार दत्ताराम भोसले, विलास कडु, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, गोरखनाथ पोटे, किशोर पाटील, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, शेकडे, सतिश सोनवणे, रविंद्र लांडगे, पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, गावित या पथकाने केली.

error: Content is protected !!