Homeठाणे-मेट्रोसाबे गावातील अर्धवट स्थितीतील इमारत पालिकेकडून मे महिन्यातच धोकादायक घोषित,मात्र पुनर्वसना अभावी...

साबे गावातील अर्धवट स्थितीतील इमारत पालिकेकडून मे महिन्यातच धोकादायक घोषित,मात्र पुनर्वसना अभावी 15 कुटुंब जीव धोक्यात घालून करतायत वास्तव्य

दिवा:- साबे गावातील सद्गुरू कृपा इमारत ही मे महिन्यात ठाणे महानगरपालिकेकडून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली. मात्र येथील नागरिकांचे पुनर्वसन न झाल्याने धोकादायक इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या येथील रहिवाशांना येन पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे.

दिव्यातील साबे गावात दहा वर्षांपूर्वी सद्गुरु कृपा इमारत बांधण्यात आली.या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने मागील काही वर्षात ही इमारत कमजोर झाली आहे.या इमारतीत राहणारे नागरिक जीव मुठीत घेऊन रहात आहेत. तसेच आम्ही मृत्यूच्या छायेत जगत आहोत असा टाहो तेथील राहणारे नागरिक फोडत आहेत.ही इमारत तीन मजल्याची असून यात तीस खोल्या आहेत.त्यातील फक्त पंधराच खोल्यांमध्ये कुटुंबे वास्तव्यास आहेत. उर्वरीत कुटुंबेही जीव मुठीत घेऊन रोजचा दिवस ढकलत आहेत. यातील तळमजल्यावरील दोन खोल्या मधील इमारतीचे खांबांचे आणि छताचे सिमेंट निघून लोखंडी सळ्या दिसायला लागल्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने खोल्या केल्या. या इमारतीस छत नसल्यामुळे पावसाचे पाणी चारही बाजूने गळत असल्याने इमारत मोडकळीस आलेली आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली. तसेच या इमारतीस मे महिन्यात ठाणे महापालिकेची धोकादायक इमारत खाली करण्याची नोटीस आलेली आहे.महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली मात्र या इमारती मधील नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबत कोणतेच धोरण नसल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे.
या धोकादायक इमारती मधील रहिवाशांना न्याय मिळुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना साबे विभाग प्रमुख निलेश पाटील या विषयावर बोलताना सांगितले.

error: Content is protected !!