दिवा:-भा.ज.पा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाने आणि युवा मोर्चा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या पुढाकाराने दिवा साबे रोड येथील राधेकृष्ण सोसायटी मधील नागरिकांनी पाणी समस्येबाबत प्रभाग समिती सहायक आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.
येथील जवळ जवळ 500 कुटुंबांना मागील 6 महिन्यांपासून भेडसावणारा पाणी प्रश्न , तसेच दिवा साबे रोड येथील रस्त्यावर बंद असलेले पथदिवे अश्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेकडो नागरिकांना सोबत घेऊन दिवा प्रभाग समिती मधील सहायक आयुक्त फारुख शेख यांची भाजप पदाधिकारी यांनी भेट घेतली.
मागील 6 महिन्यांपासून भेडसावणारा पाणी प्रश्न , तसेच दिवा साबे रोड येथील रस्त्यावर बंद असलेले पथदिवे अश्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घेण्यात आली भेट.
यावेळी ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर , मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे , संघटक सरचिटणीस दिलिप भोईर , सरचिटणीस समीर चव्हाण , ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत , व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर , महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील , सीमा भगत , अंकुश मढवी , मंडळ उपाध्यक्ष निलेश भोईर , युवा मोर्चा सरचिटणीस आशिष पाटील , नागेश पवार, सुमित मढवी, दुर्गेश मढवी, दिपेश पाटिल, साईनाथ भोईर,आकाश भोईर, विपिन भोईर, प्रणव भोईर, गौरव पाटिल,आदित्य म्हात्रे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






