दिवा: गॅस गलतीमुळे लागलेल्या आगीत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिव्यातील साबे गावात घडली आहे.
सौ. रिया संदीप देवळे वय 35 वर्षे रा. सिताबाई अपार्टमेंट बी विग, रूम नं. ४०२, डी जे कॉम्प्लेक्स, साबेगाव, दिवा पूर्व ह्या त्यांचे राहते घराला लाॅक करून सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास कामाला गेल्या होत्या. त्यानंतर रात्री 9 वाजताच्या सुमारास रूम नंबर 402 मधून गॅस गळतीचा वास येत असल्याने शेजारी राहणारे व सदर रूमची चावी असलेले शांतीलाल मोहन सोळंकी, वय 45 वर्षे, राहणार रूम नंबर 401 व श्रीमती प्रेरणा श्रीराम लांबे, वय 40 वर्ष रूम नंबर 403 यांनी सदर रूम उघडून लाईट चालू करताच रूममध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याने ते दोघे संपुर्णपणे गंभीर भाजले गेले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
दिवा पोलीस बिट चौकी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री.शेळके व पथक तसेच दिवा शीळ अग्निशामक दलाचे प्रभारी पी. डी पाटील व पथक तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकासह तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. सदर रूम मधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून गॅस गळती झालेला सिलेंडर तसेच आणखी दुसरा भरलेला सिलेंडर अग्निशामक दलाने ताब्यात घेतलेला आहे.