Homeकोकण-महाराष्ट्रसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार

मुंबई:-मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक आयोजित केली होती.

आगामी गणेशोत्सवा निमित्त या महामार्गावरील वाहतूक वाढण्या अगोदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम सुरु करण्यासाठी कार्यवाहीचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने खड्डे भरण्याचे काम पूर्ण करणार असल्याचे तसेच याबाबत कोकणातल्या लोकप्रतिनिधींना घेऊन स्वतः सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष स्थळावर जाऊन घेण्याचे चव्हाण यांना यावेळी सांगितले.

याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतुक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही या बैठकी दरम्यान वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!