Homeशहर परिसरसाळवी नगर, डिजी कॉम्प्लेक्स परिसरातील पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सुटणार

साळवी नगर, डिजी कॉम्प्लेक्स परिसरातील पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सुटणार

दिवा:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यामार्फत तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने दिव्यासाठी आलेल्या निधीतून साळवी नगर रस्ता आणि डिजी कॉम्प्लेक्स रस्त्याचे काम मंजूर झाले असून लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे.
मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पाण्याची लाईन या भागात लवकरच टाकण्यात येणार आहे. साळवी नगर आणि डिजी कॉम्प्लेक्स या परिसरात प्रत्यक्ष जागेवर जाऊन शिवसेनेच्या सर्व मा.नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

error: Content is protected !!