Homeठाणे-मेट्रोसिकलसेल मिशनला ठाण्यात सुरुवात ; १३७ जणांची केली प्राथमिक तपासणी

सिकलसेल मिशनला ठाण्यात सुरुवात ; १३७ जणांची केली प्राथमिक तपासणी

ठाणे: ठाणे जिल्ह्यात सिकलकेस मोहीम २००९ पासून राबवली जात आहे. आता याची व्याप्ती वाढवली आहे. जिल्ह्यात सुमारे ८६६ संशयित तर ८४ सिकलकेस रुग्ण आढळून आल्याने आता तरुणामध्ये सिकलसेल विषयी जागृती व्हावी तसेच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळावे या अनुशंगाने राष्ट्रीय सिकलसेल मिशन देशभरात राबविण्यात येत असताना, ठाणे जिल्हयात ही मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तब्बल १३७ जणांची सिकलसेल प्राथमिक चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १० निरोगी व्यक्तींना पांढरे कार्ड, माहिती पॅम्पलेट वितरीत करण्यात आले तसेच इतर व्यक्तींची तपासणी करुन त्यांनाही कार्ड वाटप केले. तसेच वाहक रुग्णांना पिवळे कार्ड तसेच रुग्ण व्यक्तींना लाल कार्ड वाटप करण्यात आले.
             सिकलसेल नियंत्रणासाठी केंद्र सरकार मार्फत राष्ट्रीय सिकलसेल मिशन हाती घेण्यात आले असून १ जुलै २०२३ पासून जिल्हयात विषेश मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शनिवारी १ जुलै २०२३ रोजी या मिशनचे उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमामध्ये पोर्टल बाबत, आभा कार्ड वितरण, सिकलसेल कार्ड वितरण करण्यात आले.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सिकलसेल तपासणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार निरंजन डावखरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, निवासी वैदयकिय अधिकारी डॉ. मृणाली राहूड,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. ममता अळसपूरकर, डॉ. साळवे, डॉ. खडांगडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक मनिष खैरनार, जिल्हा सिकलसेल समन्वयक प्रतिभा निखारे, जिल्हा आरबीएसके समन्वयक विनोद जोशी, सिकलसेल सल्लागार तथागत होळकर, स्वरुपा परबत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तन्वी जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडले.
ठाणे जिल्हयात या मोहिमेच्या अनुशंगाने १३७ जणांची सिकलसेल प्राथमिक चाचणी करण्यात आली. तसेच सिकलसेल तपासणी मोहिमेची सुरुवात सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय स्तरावर करण्यात आली आहे. या सिकलसेल तपासणी करुन स्थानिक मान्यवरांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.
” सिकलसेल रक्तातील लाल पेशीच्या संदर्भात आहे. पेशींना ऑक्सिजन पुरवठा पुरेसा मिळाला नाही की या पेशींची वाढ पूर्ण होत नाही. या लाल पेशी विळ्याच्या आकारासारखे दिसतात. सिकलकेस मुळे यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, हृदय किंवा इतर अवयवांमध्ये ऑक्सिजनला जाण्यापासून प्रतिबंधित करते ज्यामुळे बरेच नुकसान होते. या आजाराची लक्षणे पटकन दिसत नाहीत. मात्र रक्त चाचणीत याचे निदान मिळते. हा आजाराचे रुग्ण आनुवंशिक असतात. त्यामुळे एकापासून दुसऱ्याला हा आजार होणार नाही, याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. “-  डॉ. कैलास पवार, जिल्हा शलयचिकित्सक सिव्हील रुग्णालय.

error: Content is protected !!