Homeठाणे-मेट्रोसिव्हील रुग्णालयात बायो-मेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन कार्यान्वित

सिव्हील रुग्णालयात बायो-मेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन कार्यान्वित

रुग्णालयाच्या कक्षातील ५० ते १०० किलो जैविक कचऱ्याचे विलगीकरण आणि निर्जंतुकीकरण होणार

ठाणे : रुग्णालयात विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत असले तरी आजारांचे इन्फेक्शन हॉस्पिटलच्या कचऱ्यातून जाणार नाही. याची दक्षता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने घेत, रुग्णालयात बायो-मेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन आणण्यात आली आहे. त्या मशीनचे बुधवारी उद्घाटन झाल्याने रुग्णालयाच्या कक्षातील ५० ते १०० किलो जैविक कचऱ्याचे विलगीकरण आणि निर्जंतुकीकरण केले जाणार आहे
कोरोना नंतर वायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे. ठाणे सिव्हील रुग्णालय देखील याबाबत सजग असून, रुग्णांच्या उपचारा दरम्यान होणाऱ्या जैविक कचऱ्यातून जंतू पसरणार नाहीत यासाठी दक्षता घेतली आहे. माजी खासदार कुमार केतकर यांच्या विशेष निधीतून बायो-मेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन ही मशीन बसण्यात आली असून त्याचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
बुधवारी बायो-मेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार कुमार केतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महंगाडे, डॉ. मृणाली राहूड,डॉ. निशिकांत रोकडे डॉ. अर्चना पवार, अधिसेविका प्रतिभा बर्डे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आदी उपस्थित होते
मशीन राहणार २४ तास कार्यरत
बायो-मेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन २४ तास कार्यरत रहाणार आहे. एकाच वेळी कॉटन, ब्लेड, रबरी हॅण्डक्लोज आदी ४० किलो क्षमतेचा जैविक कचऱ्याचे विघटन केले जाणार आहे. त्यामुळे हॉस्पिटल मधून बाहेर जाणाऱ्या कचऱ्यातून जैविक जंतूचा प्रसार रोखण्यास मदत मिळणार आहे.

error: Content is protected !!