Homeठाणे-मेट्रोसोशल मिडियावर व्हायरल व्हिडीओ पडला वाहन मालकाला महाग ; दहा हजारांची दंडात्मक...

सोशल मिडियावर व्हायरल व्हिडीओ पडला वाहन मालकाला महाग ; दहा हजारांची दंडात्मक कारवाई

गाडी चालवत होता अल्पवयीन मुलगा

ठाणे:- सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एखाद्याचे नशीब बदलून टाकू शकतो. तसेच तो व्हिडीओ एखाद्याला चांगल्याच अडचणीत टाकू शकतो. याचा प्रत्यय ठाण्यातील एका चारचाकी वाहन चालक आणि मालकाला आला आहे. नुकताच सोशल मीडियावर चारचाकी वाहन शाळकरी मुलगा चालवत असून त्या गाडी काही शाळकरी मुले बसल्याचे दिसत आहे. ही गंभीर बाब लक्षात येतात, ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी त्या वाहन चालक आणि मालकाला मोटार परिवहन कायदा कलम अन्वेय प्रत्येकी ५ हजार असा तब्बल १० हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच ठाणे वाहतूक पोलिसांनी परवाना नसलेल्या कोणालाही आपले वाहन देऊ नये असे आवाहन केले आहे.
नुकताच सोशल मीडियावर MH04 LX8080 हे चारचाकी वाहन एक शाळकरी मुलगा चालवत असून त्याच्यासोबत काही शाळकरी मुले गाडी बसली आहेत. हा कसारवडवली परिसरातील असल्याने वाहतूक पोलिसांनी त्या गाडी मालक आणि चालकाचा शोध घेत कारवाई केली आहे. चालकावर मोटार परिवहन कायदा कलम 4(1)/181 अन्वये तसेच वाहनाचे मालक वर देखील मो.प. कायदा कलम 5/180 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.या दोन्ही कलमानुसार प्रत्येकी ५ हजार रुपये असा दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच चालक हा अल्पवयीन असल्याने त्याचे नाव देता येत नसून इतर गाडी बसलेल्या मुलांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.तसेच ठाणे वाहतूक पोलिसांनी परवाना नसलेल्या कोणालाही आपले वाहन देऊ नये असे आवाहन करताना, मग तो अल्पवयीन असो मोठा असो या वयोवृद्ध असो. विना परवाना वाहन चालवताना जर एखादी घटना घडल्यास त्याला मालक म्हणून आपण जबाबदार असाल. शिवाय आपल्यावर कारवाईला सामोरे जावे लागले. असे ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!