Homeशहर परिसरस्नेही पतसंस्थेच्या दिवा शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

स्नेही पतसंस्थेच्या दिवा शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

शैलेश पाटील व शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन

दिवा:-स्नेही सहकारी पतसंस्था मुंबई यांच्या दिवा शाखेचा उद्घाटन समारंभ मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. दिवा शहराचे लोकप्रिय माजी नगरसेवक दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील व भाजपचे प्रदेश सरचिटणीस भटके विमुक्त आघाडी शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते दिवा शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई बँकेचे संचालक व स्नेही सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बि.डी पारले,उद्योजक समाजसेवक कैलेश पाटील,दैनिक सागरचे विशेष प्रतिनिधी व दिवा न्यूजचे संपादक सुहास खंडागळे, आर्किटेक एच.डी पाटील, डॉक्टर कुलदीप महाजन, विनोद संखे, रंजना दोडके आदिसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी स्नेही पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर भाजपचे शिवाजी आव्हाड यांनीही सर्व उपस्थित नागरिकांना शुभेच्छा देत ही पतसंस्था येणाऱ्या काळात भरभराटीला येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संस्थेचे शाखाध्यक्ष किरण जाधव, कृष्ण जाधव,रमेश कडवेकर, श्री के.बी सालुंखे, गिरीश म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते. आई जीवदानी अपार्टमेंट गुरुदर्शन नगर, मुंब्रा देवी कॉलनी येथे या पतसंस्थेच्या शाखेचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी शाखा सदस्य समीर भारद्वाज, मंगेश सकपाळ, विकास पाटील,सचिन चव्हाण, मनोज ठाकूर, स्मिता कोकरे, रूपाली राऊत आधी जण उपस्थित होते.

error: Content is protected !!