ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिकेच्या सहकार्याने व शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात ‘उत्सव ७५ ठाणे’ साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त आंतरशालेय, आंतरमहाविदयालयीन चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, देशभक्तीपर समूहगायन या स्पर्धांना विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही सकाळी ९ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी हजेरी लावली होती. सर्व स्पर्धांसाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे उत्स्फूर्त प्रतिसाद होता. परंतु स्पर्धेच्या ठिकाणी वॉक इन सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त् ठाणे शहरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने या सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरशालेय चित्रकला स्पर्धा ५ वी ते ७ वी, ८वी ते १० वी,११ वी ते पदव्युत्तर या तीन गटात झाली. ही स्पर्धा शिवसमर्थ विद्यालय येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा मावळी मंडळ विद्यालय येथे, ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी, ११ वी ते पदव्युत्तर या तीन गटात , मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पार पडली. तर शालेय निबंध स्पर्धा सरस्वती सेकंडरी स्कुल , नौपाडा , ठाणे येथे ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी, ११ वी ते पदव्युत्तर या गटात , मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पार पडली. या सर्व स्पर्धा सकाळी १० ते १२ या वेळेत पार पडल्या.
स्व. दादा कोंडके ॲम्पीथिएटर येथे झालेल्या आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेलाही विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर करुन स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली. आनंद विश्व गुरूकुल येथे पार पडलेल्या देशभक्तीपर समूह गान स्पर्धेसही विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी आज झालेल्या सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना शहरातील प्रत्येक नागरिकांनी यात सहभागी व्हावे यासाठी ठाणे महापालिकेच्या सहकार्याने ‘उत्सव 75 ठाणे’ हा सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष शहरात साजरा होत आहे. तरी ठाणेकर रसिकांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे. कार्यक्रमाच्या माहितीसाठी http://utsavthane.com या वेबसाईटवर संपर्क साधावा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
‘उत्सव ठाणे 75’ चे सर्व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण कार्यालयीन अधीक्षक जयानंद नायकोडी, उप माहिती व जनसंपर्क अधिकारी (प्र.) प्राची डिंगणकर, संदीप जिनवाल, विकास मोरे, शुभांगी उतेकर, सुजाता सोनावणे तसचे उत्सव 75 ठाणेचे श्रीपाद भालेराव, निकिता भागवत, मकरंद जोशी, प्रज्ञा वानखेडे, सुनील सामंत, स्वानंद गांगल, संजीव हजारे, सायली दाते आदींनी मेहनत घेतली. तसेच सर्व स्पर्धांना शिवसमर्थ विद्यालय, सरस्वती विद्या मंदिर, मावळी मंडळ विद्यालय, आनंद विश्व गुरूकुलचे प्रदीप ढवळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.