Homeशहर परिसरहिंदी सक्तीच्या विरोधात दिव्यातील भाजपा पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत

हिंदी सक्तीच्या विरोधात दिव्यातील भाजपा पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत

दिवा:-पहिली पासून हिंदी सक्तीची करणाऱ्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात दिव्यातील नामांकित वकील रविराज बोटले यांनी आपल्या कायदा सेल संयोजक, भाजपा दिवा शिळ मंडळ, दिवा शहर या पदाचा राजीनामा दिला.
त्यांनी घेतलेल्या या धाडसी भूमिकेचे स्वागत करण्यासाठी मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

आपल्या मराठी अस्मितेला जपायचे असेल तर अशाच प्रकारची भूमिका इतरही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी असे तुषार पाटील यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या सोबत मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, शाखाध्यक्ष सागर निकम आणि रमेश पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!