Homeठाणे-मेट्रोहोर्डिंगवरील एलईडी स्क्रीनच्या वायरिंगला आग

होर्डिंगवरील एलईडी स्क्रीनच्या वायरिंगला आग

ठाणे:- होर्डिंगवरील एलईडी स्क्रीनच्या मागे असलेल्या वायरिंगला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घोडबंद रोड, मानपाडा या ठिकाणी दोस्ती बिल्डिंग समोर घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. तसेच त्या आगीवर २० मिनिटात नियंत्रणात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली होती. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

error: Content is protected !!