Homeठाणे-मेट्रो३० लाखांच्या गांज्यासह दोघांना अटक

३० लाखांच्या गांज्यासह दोघांना अटक

ठाणे : कारमधून गांजा विक्रीसाठी आलेल्या नाशिक येथील सागर गोविंद पवार (वय ३३) आणि धोंडीराम चैत्य भागडे (वय ५०) दुकलीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली करून त्यांच्याकडून तब्बल ३० लाख ९१ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्या दोघांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिक-मुंबई महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळून एका कारमधून २४ फेब्रुवारी रोजी गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती त्या, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयित कार अडवून तपासणी केली असता कारमध्ये प्लास्टिकच्या गोणीत ठेवलेला १२३.६४० किलो वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची बाजारातील किंमत सुमारे ३० लाख ९१ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करत सागर पवार आणि धोंडीराम भागडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गांजासह त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास गुन्हे शाखा घटक-१ मार्फत सुरू आहे.

error: Content is protected !!