Homeशहर परिसरशिक्षणासोबत शहाणपण गरजेचे! शिक्षणावरून टीका करणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल, निलेश पाटील यांचा...

शिक्षणासोबत शहाणपण गरजेचे! शिक्षणावरून टीका करणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल, निलेश पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा

दिवा शहरातील साबे गाव शाळेच्या इमारतीचा मुद्दा चर्चेत

दिवा:– शिक्षणासोबत शहाणपण गरजेचे, शिक्षण आहे म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचे लायसन मिळाले का?असा सवाल शिवसेनेचे निलेश पाटील यांनी केला आहे.कमी शिक्षित लोकांनी आम्हाला शिकऊ नये असे अजब उत्तर देणाऱ्या ठाकरे गटाच्या सचिन पाटील यांना निलेश पाटील यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. आरोप प्रत्यारोप वाढू लागल्याने शाळेच्या इमारतीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.

दिवा शहरातील साबे गावातील शाळेच्या इमारतीचं काम अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात ती सुरू सुद्धा होणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन ठाकरे गटाचे सचिन पाटील यांनी लहान मुलांना उन्हात आणि पावसात बसावं लागत आहे, तरी नवीन इमारती मध्ये शाळा सुरू करावी अशी ही मागणी केली होती. याला उत्तर देताना निलेश पाटील यांनी मुलांना सुट्टी असताना लहान मुलं शाळेत येऊन उन्हा पावसात कशी काय बसू शकतात? स्वतःच्या घराजवळ शाळा भरत असून ठाकरे गटाच्या सचिन पाटील यांना शाळेला सुट्टी आहे हे माहिती नाही का? असा जोरदार टोला लगावला होता. यावर पुन्हा उत्तर देताना ठाकरे गटाच्या सचिन पाटील यांनी कमी शिक्षण झालेल्या व्यक्तींनी आम्हाला शिकवू नये असे म्हटले आहे.
शिक्षण जास्त झालं म्हणजे तुम्ही खोटं बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची का? असा संतप्त सवाल आता शिवसेनेचे निलेश पाटील यांनी केला आहे. आपले वडील ही शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांचं ही शिक्षण कमी झाले आहे त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आपण अशाच प्रकारे अहंकाराने बोलता का? दोन वर्षांपासून शाळेची इमारत तयार आहे असे म्हणणाऱ्या सचिन पाटील यांनी वर्षभरापूर्वी नगरसेविका असणाऱ्या आपल्या भावाच्या पत्नी विरुद्ध असा आवाज का उठवला नाही? असा सवाल देखील निलेश पाटील यांनी केला आहे.
येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळेची नवीन इमारत सुरू होणारच आहे,मात्र हे माहीत असल्याने सचिन पाटील स्टंट केल्याने त्यांचा उतावळेपणा दिवावासीयांच्या समोर आला असल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!