ठाणे: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली चरई शिवसेना शाखेच्या वतीने शनिवारी ५०० हून अधिक गरीब गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले.
ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक मंदार विचारे, युवासेना अधिकारी किरण जाधव, योगेश सावंत, विभाग प्रमुख जिवाजी कदम, शाखा प्रमुख राजू मोरे, धोंडू मोरे, समन्वयक राम काळे, सुधीर बेलोसे, बाबू शेलार, रवी लोंढे, विनायक आंबेकर, संजय कर्णिक, दीपक चोणकर, गणेश कुंभार तसेच इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.