दिवा:-भाजपने जिल्हाध्यक्ष बदलल्या नंतर आता मंडळ अध्यक्ष देखील बदलले असून दिवा मंडल अध्यक्ष म्हणून सचिन भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिन भोईर हे मागील काही वर्षापासून भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून दिवा शहरात काम करत आहेत. भाजपचे मावळते दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्यानंतर सचिन भोईर हे आता दिवा शहर भाजप मंडळ अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सचिन भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांच्यावर मंडळ अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.